शेंदुरवादा प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार
गंगापूर, (प्रतिनिधी) : रुग्णवाहिकेला इंधन मिळत नसल्याने ती जागेवरच उभी असल्याचा प्रकार शेंदुरवादा - प्राथमिक आरोग्य केंद्रात घडत आहे. यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल - होत असून यासंदर्भात येथील नागरिकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना - निवेदन देवून तत्काळ रुग्णवाहिका - सुरू करण्याची मागणी केली आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदुरवादा येथील शासकीय रुग्णवाहिका सेवा गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून डिझेलअभावी पूर्णतः बंद आहे. यामुळे गंभीर रुग्णांना वेळेत सेवा मिळत नसल्याने रुग्णांसह नातेवाईकांना मोठा मनस्तःप सहन करावा लागत आहे. - शिवाय वेळेत उपचार मिळत - नसल्याने रुग्णांना मरणयातना - सहन करण्याची वेळ आली आहे.
यासंदर्भात आरोग्य केंद्रातील संबंधित अधिकाऱ्यांकडे
चौकशी केली असता, रुग्णवाहिकेमध्ये रुग्णांच्या जीवितास धोका :
या गंभीर परिस्थितीमुळे शेंदूरवादा व परिसरातील ग्रामीण, गोरगरीब व गरजू रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. आपत्कालीन प्रसंगी रुग्णांना वेळेवर रुग्णालयात हलवता येत नसल्यामुळे रुग्णांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. प्रसूती रुग्ण, अपघातग्रस्त, वृद्ध व गंभीर आजारी रुग्णांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून, अनेकवेळा आर्थिक अडचणींमुळे उपचारांमध्ये विलंब होत आहे. शिवाय रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याने मरणयातना सहन करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे नातेवाइकांमध्ये रुग्णालयाच्या कामकाजाविषयी संताप व्यक्त केला जात आहे.
तर आंदोलन छेडू :
शासनाच्या आरोग्य यंत्रणेतील हा प्रकार अत्यंत दुदैर्वी, धक्कादायक व जनहिताच्या विरोधात आहे. डिझेलसारख्या अत्यावश्यक बाबीअभावी रुग्णवाहिका सेवा बंद राहणे हे आरोग्य विभागाच्या गंभीर निष्काळजीपणाचे उदाहरण आहे. सदर प्रकरणी प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून रुग्णवाहिकेसाठी आवश्यक डिझेलची व्यवस्था करून सेवा त्वरित सुरू करावी, अन्यथा शासन व आरोग्य विभागाविरोधात मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर अक्षय तांबे, चरण चक्रनारायण, संतोष माळी, आसिफ शहा, राहुल ढोले यांच्या सह्या आहेत.
डिझेल नसल्यामुळे सेवा देता येत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच शासनाकडून रुग्णवाहिकेसाठी आवश्यक डिझेलसाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे वाहन रस्त्यावर उतरवता येत नसल्याचे सांगण्यात आले.















